
शिवसैनिकांनी कुठलाही गोंधळ घालू नये; उद्धव ठाकरेंचं आवाहन
मुंबई : ठाकरे सरकारला उद्या बहुमत चाचणीला सामोरे जावेच लागेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधत राजीनामा देत असल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी राज्यात कोणत्याही शिवसैनिकांनी गोंधळ घालू नये असे आवाहन केले आहे. उद्या कोणत्याही शिवसैनिकांनी अस्तित्वात येणाऱ्या नव्या सरकारच्या मधे येऊ नये त्यांना त्यांचा गुलाल उधळू द्या असे म्हटले आहे. उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. हा सोहळा जबरदस्त झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही येणार नाही. तुम्ही या आणि घ्या शपथ असे ठाकरे यांनी म्हटले आहे. (Uddhav Thackeray Latest News In Marathi)
हेही वाचा: मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा राजीनामा, महाराष्ट्रात सत्ताबदल अटळ
उद्धव ठाकरे म्हणाले की, उद्या शिवसेनाप्रमुखाच्या पोराला मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचण्याचं पुण्य त्यांना लाभणार आहे. मला पद जाण्याची खंत अजिबात नाही, बहुमतामध्ये मला रस नाही. केंद्राच्या सूचनेवरून मुंबईत सुरक्षा वाढवली जातेय. उद्या चीन सीमेवरील सुद्धा सुरक्षा मुंबईत येईल. यावेळी शरद पवार आणि सोनिया गांधींनी खूप सहकार्य केलं असे म्हणत ठाकरे म्हणाले की, रिक्षावाले पानटपरीवाल्यांना मंत्री आणि नगरसेवक केलं. चांगलं काम सुरु असताना दृष्ट लागली. ज्यांना आज सर्व दिलं तेच नाराज झाले. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला केवळ चारच मंत्री होते याचं दुःख झाल्याच्याही भावना उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
हेही वाचा: बहुमत चाचणी होणारच! सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं, माहिती एका क्लिकवर
नामांतराचे ठराव मांडले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एका शब्दाचाही विरोध केला असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. विरोधकांनी पत्र देताच कोर्टानं 24 तासाच्या आत निकाल दिला. मात्र, राज्यापालांनी 12 आमदारांचा निकाल काही दिला नाही असे म्हणत त्यांनी कोश्यारींना टोला लगावला. मी आवाहन करूनही गुवाहाटीला गेलेले आमदार माझ्यासमोर आले नाही.
Web Title: Uddhav Thackeray Appeal To Make Peace In State Tomorrow
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..