
‘उद्धवजी भाषण देण्यापेक्षा पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करा’
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील अबकारी कर कमी करून देशातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे. महाराष्ट्रातर्फे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार व्यक्त करतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी महागाईवर भाषण देण्यापेक्षा मोदी सरकारप्रमाणे पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केली. (chandrakant patil said, Instead of giving speeches, reduce taxes on petrol and diesel)
मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतील देशातील नऊ कोटी गॅस ग्राहकांना बारा सिलिंडरपर्यंत प्रति सिलिंडर दोनशे रुपये सबसीडी जाहीर केली आहे. तसेच सिमेंट आणि स्टीलच्या आयातीवरील कर कमी केला आहे. तर निर्यातीवरील कर वाढविला आहे. परिणामी सिमेंट व स्टीलचे दर कमी होतील. मोदी सरकारच्या या निर्णयांमुळे देशातील महागाई कमी होण्यास मदत मिळेल, असेही चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले.
हेही वाचा: Honey Trap : पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या भारतीय जवानाला अटक
मोदी सरकारने नोव्हेंबर महिन्यात पेट्रोलवरील (petrol) कर पाच रुपये तर डिझेलवरील (diesel) कर दहा रुपये कमी केला होता. त्यामुळे देशातील जनतेला मोठा दिलासा मिळाला होता. त्यानंतर देशभरातील २२ राज्यांनी इंधनावरील कर कमी केल्यामुळे तेथील जनतेला आणखी दिलासा मिळाला. परंतु, महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करण्यास नकार दिला. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला नाही, अशी आठवणही चंद्रकांत पाटील यांनी करून दिली.
महागाई कमी करण्यास हातभार लावा
आता मोदी सरकारने दुसऱ्यांदा इंधनावरील कर कमी केला आहे. आतातरी महाविकास आघाडी सरकारने (uddhav thackeray) कर कमी करून जनतेला दिलासा दिलासा पाहिजे. महागाईवर भाषणे करण्यापेक्षा महाविकास आघाडी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील कर कमी करून महागाई कमी करण्यास हातभार लावला पाहिजे, असे चंद्रकांत पाटील (chandrakant patil) म्हणाले.
Web Title: Uddhav Thackeray Chandrakant Patil Petrol Diesel Price Low
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..