Uddhav Thackeray: 'जमत नसेल तर सांगावं, जबाबदारी घ्यायला तयार!' ठाकरेंची डरकाळी

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य करताना सत्ताधारी पक्षावर तोफ डागली आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackerayesakal

Uddhav Thackeray comment on eknath shinde : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात होत असलेल्या वेगवेगळ्या घडामोडींवर भाष्य करताना सत्ताधारी पक्षावर तोफ डागली आहे. राज्याचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज याबरोबरच बेळगाव प्रश्न यावर सत्ताधारी कोणतीही भूमिका घ्यायला तयार नाहीत. त्यावरुन ठाकरे यांनी शिंदे गटावर कडाडून टीका केली आहे.

महाराष्ट्राचा अपमान सहन करणार नाही. आपण राज्याच्या स्वाभिमानासाठी एकत्र येऊयात. त्यामुळे आपण आता जागे होण्याची गरज आहे. येत्या १७ तारखेला सत्ताधारी पक्षाच्या विविध निर्णयांचा आणि त्यांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी घोषणा यावेळी करण्यात आली. या परिषदेला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे छगन भुजबळ, कॉग्रेसचे बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण उपस्थित होते.

याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी सरकारवर कडाडून टीका करताना शिंदे सरकारला थेट आव्हान दिले आहे. बेळगावचा प्रश्न दिवसेंदिवस भडकत चालला आहे. त्याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही. अशावेळी सरकार काय करतं आहे, त्यांना बेळगावचा प्रश्न सोडवायचा आहे की नाही, त्यांना जमत नसेल तर त्यांनी त्याविषयी स्पष्टपणे सांगावे. आपण सरकार चालवण्याची आणि बेळगावात जाण्याची अशा दोन्ही जबाबदाऱ्या घ्यायला तयार आहोत. असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Uddhav Thackeray
Rahul Gandhi : मोदींच्या नावे घोषणा देणाऱ्यांना राहुल गांधींकडून प्लाइंग किस; पाहा Viral Video

उद्धव यांच्या वक्तव्याची आता सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. त्यावर नेटकऱ्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे हे अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com