उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 3 डिसेंबर 2018

वाशिममध्ये बंजारा समाजाच्या संत सेवालाल मंदिर परिसरात विकास कामांचे सोमवारी भुमिपुजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बालविकास मंत्री पंकजा मुंडे आदी मंत्रिमंडळातील नेते उपस्थित होते.

वाशिम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एका कार्यक्रमात एकत्र आले होते. मराठा आरक्षण कायदा लागू केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे जाहीररित्या अभिनंदन केले.

वाशिममध्ये बंजारा समाजाच्या संत सेवालाल मंदिर परिसरात विकास कामांचे सोमवारी भुमिपुजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, बालविकास मंत्री पंकजा मुंडे आदी मंत्रिमंडळातील नेते उपस्थित होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे. बंजारा समाज हा लढवय्या समाज आहे. या समाजाला आपण शिक्षणाची सुविधा दिली तर ते देशाचा आधारस्तंभ होतील. संत सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजाचेच नव्हते ते संपूर्ण जगाचे होते. मराठा आरक्षण कायदा लागू केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे उद्धव यांनी कौतुक आणि अभिनंदन केले.

Web Title: Uddhav Thackeray congratulates Devendra Fadnavis for Maratha Reservation