Uddhav Thackeray : आता बास अति होतंय, उद्धव ठाकरे संतापले! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Shivsena

Uddhav Thackeray : आता बास अति होतंय, उद्धव ठाकरे संतापले!

पुणे : उद्धव ठाकरे गटाच्या हातून शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण गेलं. यानंतर सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. उद्धव ठाकरे गटाकडून सातत्याने यासाठी भाजपला जबाबदार धरण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

हेही वाचा: Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांनी लोकशाहीचा खेळखंडोबा केला; त्यांच्याकडे लक्ष देऊ नका

तुम्ही मुख्यमंत्री झाला, पक्ष फोडला ते ठीक आहे. पण आता यांना पक्षप्रमुख व्हायचं आहे. हे आती होतंय, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला राग व्यक्त केला आहे. वास्तविक पाहता, उद्धव ठाकरे कधी संतप्त होताना दिसत नाही. मात्र आज त्यांनी आता बास म्हणत सूचक विधान केलं आहे.

हेही वाचा: निकाल विरोधात गेली की भाजपचा हात अन्...; मुनगंटीवारांनी ठाकरे गटाला फटकारलं

शिवसेनापक्ष प्रमुख म्हणून होण्याचा प्रयत्न केला जातोय. याचे वाईट वाटते. आपला मेळावा होऊ नये म्हणूनही काही जणांनी प्रयत्न होते. एकीकडे पंचतारांकितपणा होता. दुसरीकडे आपले साधे शिवसैनिक होते. आम्ही काहीही ठेवलं नव्हतं. माझ्या शिवसेनेसाठी मी काहीही करेल असा विचार करुन ते मेळाव्यासाठी आले होते, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

या लोकांनी स्वत:च्या आईच्या पोटात खंजीर खुपसला. शिवसेनेचा घात केला. आता काय मिळणार असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Uddhav Thackeray