मुख्यमंत्र्यांची गुगली... भाजपाला सोबत घेण्यासाठी चाचपणी?

मुख्यमंत्र्यांची गुगली... भाजपाला सोबत घेण्यासाठी चाचपणी?

Uddhav Thackeray Marathi news : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थिती लावली. मराठवाड्यासाठी विविध घोषणा करतानाच मुख्यमंत्र्यांच्या एका वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी भाजपाचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह पालकमंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आजी-माजी एकत्र आले तर, भावी सहकारी एकत्र येऊ, असं जाहीर वक्तव्य केल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, येणारा काळ सर्वकाही ठरवेल, असं पत्रकारांना सांगत उद्धव ठाकरेंनी राजकीय चाचपणीसाठी सुरुवात केल्याचे संकेत मिळत आहेत.

रावसाहेब दानवे यांनी सुद्धा शिवसेना आणि भाजपाची एकच विचारसरणी असल्याचं म्हटलं. तसेच राज्यातील जनतेचा कौल आम्हालाच असल्याचे सांगितले. यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजपा एकत्र दिसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर बोलताना, उद्धव ठाकरेंची पुन्हा मुंबईत भेट घेणार असल्याची माहिती दानवेंनी प्रसारमाध्यमांना दिली. या संपूर्ण घटनेवर बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं, असं म्हटल्याने आता युतीसाठी अप्रत्यक्ष अनुमोदन दिल्याचं चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांची गुगली... भाजपाला सोबत घेण्यासाठी चाचपणी?
उद्धव ठाकरेंच्या मनातलं मी कसं ओळखणार - नारायण राणे
  • स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुन्हा युतीची चाचपणी?

येणाऱ्या काळात राज्यात पाच महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्यासाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिलाय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या युतीबद्दल चर्चा सुरू आहेत. या निवडणुकांमध्ये बृहन्मुंबई महनगरपालिका आणि पुणे मनपा यांच्याही निवडणुका तोंडावर आहेत. मुंबईत शिवसेना तर पुण्यात भाजपाची सत्ता आहे. यावेळी युतीबाबत होणारी चर्चा येणाऱ्या काळात नव्या समीकरणांची नांदी ठरू शकते.

या दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता सेनेला पर्याय उपलब्ध असल्याचं सूचित केलं आहे. त्यामुळे राज्यात एकत्र नांदणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील इशारा दिल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी मांडले आहे. त्यातच आता मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे युतीचे दरवाजे पुन्हा उघडल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांची गुगली... भाजपाला सोबत घेण्यासाठी चाचपणी?
आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी! तर्क-वितर्क व चर्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com