सरनाईक ते मुश्रीफ, सोमय्यांच्या रडारवर ठाकरे सरकारमधील 12 मंत्री | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरनाईक ते मुश्रीफ, सोमय्यांच्या रडारवर ठाकरे सरकारमधील 12 मंत्री

सरनाईक ते मुश्रीफ, सोमय्यांच्या रडारवर ठाकरे सरकारमधील 12 मंत्री

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या सातत्यानं महाविकास आघाडी सरकारवरमधील नेत्यांवर टीका करत आहेत. वारंवार ते राज्य सरकारमधील मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करत असून ईडीकडे तक्रार दाखल करत आहेत. आज, किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीम यांच्यावर 127 कोटी रुपयांच्या भ्रष्ट्राचार आणि घोटाळ्याचे आरोप केले आहेत. मुश्रीफ यांची ते ईडीकडे तक्रार करणार आहेत. आता हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमीरा लागणार का? अशी र्चा सुरु झाली आहे. मागील दोन वर्षांत ठाकरे सरकारमधील प्रताप सरनाईक यांच्यापासून ते हसन मुश्रीफ यांच्यापर्यंत 2 मंत्र्यावर बेनामी संपत्ती, भ्रष्ट्राचार आणि घोटाळ्याचे आरोप सोमय्यांनी केले आहेत.

सोमय्यांच्या रडारावरील नेत्यांची नावे -

प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, भावना गवळी, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर, किशोरी पेडणेकर, अनिल परब, हसन मुश्रीफ

काय आरोप ?

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी अनधिकृत बांधकाम केलं. माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या वसुली कांडात ईडीने पुरावे दिले. परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट, परिवहन विभागात चौकशी, शिवसेना खासदार भावना गवळी यांनी बँकेचे पैसे लाटले, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी गाळे ढापले, माजी मंत्री रवींद्र वायकर आणि रश्मी ठाकरेंनी मिळून जमीन घोटाळा केला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची एसआरएचा भूखंड प्रकरणी चौकशी, शिवसेना आमदार यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांनी UAEमध्ये पैसे पाठवले तर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला बांधला, आता हसन मुश्रीफ यांनी 127 कोटी रुपयांच्या भ्रष्ट्राचार केला असा आरोप केला आहे.

हेही वाचा: होय साखरपूडा झाला; बॉलिवूडमधील 'कमांडो'ची कबूली

आतापर्यंत कुणावर कारवाई अन् कुणाला नोटीस?

अनिल देशमुख यांच्यावरील 100 कोटींच्या आरोपात ईडीला पुरावे दिले.

अनिल परब यांना ईडीची नोटीस

भावना गवळी यांचं घर आणि कार्यालय जप्तीची नोटीस काढण्यात आली

प्रताप सरनाईक ईडीच्या रडारावर, काही दिवस बेपत्ताही;सुमारे 5,500 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप

मिलिंद नार्वेकर यांनी अनधिकृत बंगला पाडला

Web Title: Uddhav Thackeray Gov Minister Pratap Sarnaik To Hasan Mushrif Kirit Somaiya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Kirit Somaiya