
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्ष आणि चिन्ह, लोकसभेत यशानंतरही विधानसभेचा पराभव यासह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही घणाघाती टीका केली. निवडणूक आयोग धोंड्या असून त्या धोंड्याला शेंदूर फासला तरी धनुष्यबाण चिन्ह दुसऱ्याला द्यायचा अधिकार नाही असंही ठाकरेंनी म्हटलं. सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची ही दिलखुलास मुलाखत घेतलीय.