Uddhav Thackeray : काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरी मिळत नाही; नाव न घेता राणेंना टोला

Uddhav Thackeray : काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरी मिळत नाही; नाव न घेता राणेंना टोला

महाडः उद्धव ठाकरे यांची महाड येथे सभा होत आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी नारायण राणे यांच्यावर खास शेलक्या शब्दांमध्ये टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काहींना माझ्यावर टीका केल्याशिवाय गळ्याखाली घास उतरत नाही. एवढंच काही त्यांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरीच मिळत नाही. माझ्यामुळे त्यांच्या भाकरीची सोय होतेय, हेही नसे थोडके.

Uddhav Thackeray : काही जणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय भाकरी मिळत नाही; नाव न घेता राणेंना टोला
Snehal Jagtap: स्नेहल जगताप यांचा कुटुंबियांसह ठाकरे गटात प्रवेश; मिळाली महत्वाची जबाबदारी

उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे...

आपल्या सभांना मैदानं अपूरी पडताहेत. अनेकांना वाटलं शिवसेना संपली, पण तसे नाही. सगळी माणसं आता सहस्त्रपटींनं माझ्यासोबत आहे. काहीजणांना माझ्यावर टीका केल्याशिवाय त्यांना भाकरच मिळत नाही. पण मला त्याचे समाधान मिळते. माझ्यावर बोलून भाकर मिळते हेही नसे थोडके.

आमच्यातील गद्दार घेऊन भाजपने त्यांना डोक्यावर चढवले. मात्र जगतापांचे तसे नाही. त्यांना आम्ही काहीही दिलेलं नाही. आज माझ्याकडे सत्ता नाही. पाठीवरती वार तर आपल्याच लोकांनी केले. भाजपनं एवढा नीच डाव केला की, चिन्ह, पक्ष दोन्हीही चोरलं. मी आज तुमच्यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घेऊन आलो आहे. बाकी काही नाही.

महाडच्या नगराध्यक्षा आणि काँग्रेस नेत्या स्नेहल जगताप यांनी आज शिवसेनेच्या ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या महाड येथील सभेदरम्यान उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यावेळी त्यांच्यावर ठाकरे गटाकडून एक महत्वाची जबाबदारी देखील सोपवण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com