Uddhav Thackeray vs Sharad Pawar : शरद पवार नाहीत, तर महाविकास आघाडीचे खरे 'दादा' उद्धव ठाकरे!

Uddhav Thackeray vs Sharad Pawar
Uddhav Thackeray vs Sharad Pawar
Updated on

काल (रविवार) छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा पार पडली. या सभेतून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी या सभेतून हल्लाबोल केला. मात्र कालच्या सभेतून महाविकास आघाडीत अंतर्गत चर्चेला उत आला आहे. राजकीय वर्तुळात देखील या चर्चेला उधाण आलं आहे. 

महाविकास आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार नाहीत, तर उद्धव ठाकरे असल्याची चर्चा रंगली आहे. याला कारण म्हणजे काल संभाजीनगर भगवेमय झाले होते. महाविकास आघाडीच्या व्यासपीठावरील बॅनरवर उद्धव ठाकरेंचे मोठे कटआऊट होते. तर इतर नेते छोटे चौकोणी फोटोंमध्ये सामावले होते. तसेच सर्व नेत्यांपेक्षा सर्वात जास्तवेळ भाषण उद्धव ठाकरे यांनीच केले. त्यामुळे महाविकास आघाडीचे खरे दादा शरद पवार नाहीत तर उद्धव ठाकरे असल्याचे स्पष्ट होते. 

उद्धव ठाकरे यांना वज्रमुठ सभेत वेगळ्याप्रकारे प्रमोट करण्यात आलं. उद्धव ठाकरे जेव्हा व्यासपीठावर आले तेव्हा सर्व नेते उभे राहीले. त्यांनी ठाकरेंचे स्वागत केले. यावेळी फटाक्यांची मोठी आतिषबाजी झाली. त्यांची खुर्ची देखील वेगळी होती. तसेच महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी भाषणात उद्धव ठाकरे यांचा आदरपूर्वक उल्लेख केला.  

Uddhav Thackeray vs Sharad Pawar
Sambhajinagar Violence : "राष्ट्रवादीने जाणीपूर्वक दंगल पेटवली"; भाजप खासदाराने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

कालची सभा पाहिली तर उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला मोठा प्रतिसाद मिळाला. शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याबाबत महाराष्ट्रात सहानाभुतिची लाट आहे. या लाटेचा लाभ करुन घ्यायचा असा माहाविकास आघाडीचा राजकीय डाव असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंचा प्रमुख चेहरा केला तर आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फायदा होईल. पुण्यातील पोटनिवडणुकीत पाहायला मिळालं.  

उद्धव ठाकरे यांना प्रमुख करुन त्यांना बाकी दोन पक्ष पाठिंबा देतील. कारण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. याचा फायदा निवडणुकीत करुन घेण्याचा महाविकास आघाडीचा प्लॅन असल्याची चर्चा आहे. 

Uddhav Thackeray vs Sharad Pawar
Sambhaji nagar : राजकारणाचा केंद्रबिंदू ठरतंय छत्रपती संभाजीनगर

सभा संभाजीनगरमध्येच का?

सभा महाविकास आघाडीची असली तरी यासाठी ठाकरे गटाने सगळ्यात जास्त पुढाकार घेतलेला दिसला. उद्धव ठाकरे यांच्याच भाषणांची सर्वांना उत्सुकता राहिली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाचे मैदान भरल्याने त्यांनी भाजप आणि शिवसेना (शिंदे गटावर) सर्वाधिक शाब्दिक हल्ला केला आहे.

राज्यात शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी महाविकास आघाडीच्या पहिल्या सभेसाठी संभाजीनगरची निवड केली. येथे चार आमदार शिवसेना (शिंदे) गटात गेले आहे. त्यामुळे येथे भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आपली ताकद दाखविण्यासाठी वज्रमूठ सभेतून जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे.

Uddhav Thackeray vs Sharad Pawar
Sharad Pawar : पवार म्हणाले, "राष्ट्रवादीचे नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का?"; अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com