

uddhav thackeray old interview
esakal
Shiv Sena UBT: राज्यात सध्या चर्चा आहे ती 'ऑपरेशन टायगर'ची उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी ठाकरेंना सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला, म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. या पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंनी राज्यभर दौरा काढला आहे. ठाकरेंचा पक्ष सातत्याने का फुटतो? या प्रश्नाचं उत्तर- ते नेते, कार्यकर्त्यांना वेळ देत नाहीत.. असं दिलं जातं. सत्तापक्षातून तोच सूर कायम आळवला जातो.