काळ सर्वात शक्तिशाली गोष्ट.., सोशल मीडियावर जनतेचे 'बहुमत' उद्धव ठाकरेंना

कोरोनाकाळात मजबूत आणि भरीव कार्य करणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे CM उद्धव ठाकरे
Uddhav Thackrey Social Media Trend
Uddhav Thackrey Social Media Trend
Summary

कोरोनाकाळात मजबूत आणि भरीव कार्य करणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे CM उद्धव ठाकरे

महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकींचा निकाल लागला आणि राजकीय घडामोडींना वेग आला. या काळात अनेक राजकीय सत्तानाट्य रंगली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी आमदारांना घेऊन शिवसेनेविरोधात बंड पुकारलं. (maharashtra politics) या बंडामुळे मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, या सगळ्याचे पडसाद म्हणून महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. काल रात्री उशिरा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. (Uddhav Thackrey Social Media Trend)

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काल त्यांनी जनतेसमोर मी मु्ख्यमंत्री पदावरून पायउतार होत असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी स्वत: राजभवनात जाऊन राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे हे संवेदनशील मुख्यमंत्री होते आणि महाराष्ट्राने एक माणुसकी जपणारा मुख्यमंत्री गमावला असल्याचे अनेक मेसेज सोशल मीडियावर फिरु लागले. (Uddhav Thackrey Social Media Trend)

दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी पदाचा राजीनामा दिल्याने भाजप कार्यकर्त्यांनी मात्र जल्लोष केलेला पहायला मिळाला. हारु नका, लढत रहा.. आम्ही तुमच्या सोबत आहोत, शिवसैनिक नेहमीच तुमच्या सोबत राहतील असे मेसेज सोशल मीडियावर फिरु लागले. दरम्यान, सोशल मडियावर अनेक नेटकऱ्यांनीही उद्धव ठाकरे यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत, तुमचा अभिमान आहे, असं म्हटंल आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आभारी आहोत.. तुमच्यासारखा संवेदनशील मुख्यमंत्री महाराष्ट्राने गमावला आहे. कोरोनाकाळात मजबूत आणि भरीव कार्य करणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे उद्धव ठाकरे... पदे येतील आणि जात राहतील, पण खरी संपत्ती जनतेची आपुलकी आहे. गेल्या 2 वर्षात लोकांकडून हे मिळण्याचे भाग्य लाभलेले मुख्यमंत्री ठाकरे... आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. काळ ही सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. तो बदलतो. शिवसेना पुन्हा उभारी घेईल, पुढील वाटचालीस शुभेच्छा.. अशा प्रकारे अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com