Uddhav Thackeray : जिंकण्यासाठीच मैदानात उतरा; उद्धव ठाकरेंनी फुंकलं रणशिंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray : जिंकण्यासाठीच मैदानात उतरा; उद्धव ठाकरेंनी फुंकलं रणशिंग

उ Uddhav Thackeray : जिंकण्यासाठीच मैदानात उतरा असं आदेश देत उद्धव ठाकरेंनी आगामी काळातील निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले आहेत. आगामी काळात होऊ घातलेल्या महापालिका आणि सिनेटच्या निवडणुका लक्षात घेता ठाकरेंनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वरील आदेश दिले आहेत.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हेही वाचा: Uddhav Thackeray : लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र येऊ; उद्धव ठाकरे

आगामी निवडणुकांकडे बघता एकमेकांशी समन्वय साधून काम करा असेही ठाकरेंनी म्हटले आहे. आपल्याला जिंकण्यासाठीच मैदानात उतरायचं आहे, असा विश्वासह यावेळी ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे. शिवसेना भवनात पार पडलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरेंनी वरील आदेश दिले आहेत.

हेही वाचा: Maharashtra Politics: शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गटाची लढाई निर्णायक टप्प्यावर

सत्ता येतात जातात परंतु आपल्याला संघटना वाढीसाठी काम करावे लागणार आहे. सध्याच्या सरकारची त्यांच्या सोयीनुसार प्रभागाची रचना करून घेण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळेच या सरकारने पुन्हा नव्याने प्रभाग रचना करण्याचे आदेश दिल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे. एकूणच काय तर, सध्याच्या सरकारचा मनमानी कारभार सुरु असल्याचेही ते म्हणाले.