Maharashtra Politics: शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गटाची लढाई निर्णायक टप्प्यावर

कागदपत्रांच्या आधारे निवडणूक आयोग आपला निर्णय देणार
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsEsakal

शिवसेना कुणाची या शिंदे ठाकरे गटाच्या वादावरती सगळी लढाई आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहचली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. तर याच कागदपत्रांच्या आधारे निवडणूक आयोग आपला निर्णय देणार आहे.

दरम्यान 8 ऑक्टोबरला अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला होता. त्यावेळी शिवसेना हे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं होतं. त्यानंतर दोन्ही गटांना वेगवेगळी चिन्हं देण्यात आली होती. निवडणूक आयोगाचा हा तात्कालिक निर्णय होता. निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय आणखी दिला नव्हता. आताची जी कागदपत्रांची जी लढाई आहे ती अंतिम लढाईसाठीची आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव नेमकं कोणाचं आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीमध्ये लवकरच मिळणार आहे.

हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

12 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाने एक पत्रक जारी केलं होतं. तयामध्ये दोन्ही गटांना सांगण्यात आलं होतं की, 23 तारखेपर्यंत जी काही माहिती कागदपत्रे सादर करायची आहेत ती करा. या तारखेपर्यंत सादर होणारी कागदपत्रे अंतिम मानली जातील. त्यामुळे आज दुपारपर्यंत जी काही कागदपत्रे सादर होतील त्याच्याच आधारावर हा अंतिम निर्णय होणार आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: शिवसेना नेमकी कुणाची? दिल्लीमध्ये ठाकरे गटाकडून हालचालींना वेग

आज कागदपात्रांची पूर्तता झाल्यानंतर निवडणूक आयोगाची प्रक्रिया झाल्यानंतर त्यानुसार सुनावणीसाठी एखादी तारीख देण्यात येईल. त्यानंतर या सूनवण्या होत राहतील. दोन्ही बाजूनी युक्तिवाद होत राहतील आणि त्यानंतर निवडणूक आयोग आपला निर्णय देईल. आज कागदपत्रे जमा करण्याची शेवटची तारीख असून लवकरच शिवसेना कोणाची हे ठरेल असं दिसत आहे.

Maharashtra Politics
Shivsena Akola News : भावना गवळी-विनायक राऊत आमनेसामने; समर्थकांकडून पुन्हा 'गद्दार'ची घोषणाबाजी

राज्यातील राजकारणात अनेक खळबळ माजवणारी घटना काही दिवसांपूर्वी घडली. एकनाथ शिंदे आणि आमदारांनी शिवसेनेतून बंड करून भाजपसोबत सरकार स्थापन केलं. त्यानंतर नेमकी शिवसेना कोणाची याबाबत शर्यत निर्माण झाली होती. शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्याकडून खरी शिवसेना आमचीच असं सांगण्यात येत होतं. खरी शिवसेना कोणाची या प्रश्नाभोवती राज्यातील राजकारण ढवळून निघालं. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाला यासंबधी कागदपत्र सादर केली जाणार आहे.


Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com