'मी पुन्हा येईन'ची शेतकऱ्यांना भिती- उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 3 November 2019

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढत असतानाच ओला दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसोबतच सगळ्यांना 'मी पुन्हा येईन' या वाक्याची धास्ती भरली असल्याचे म्हटले आहे. पाऊस नेहमी मी पुन्हा येईन म्हणतोय हे खूप घातक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यांनी या वाक्यातून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला आहे.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेचा तिढा वाढत असतानाच ओला दुष्काळाच्या पाहणी दौऱ्यावर असणाऱ्या शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसोबतच सगळ्यांना 'मी पुन्हा येईन' या वाक्याची धास्ती भरली असल्याचे म्हटले आहे. पाऊस नेहमी मी पुन्हा येईन म्हणतोय हे खूप घातक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यांनी या वाक्यातून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला आहे.

उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, शिवसेना सत्तेत असेल की नाही हे येणाऱ्या काळात कळेल. मी ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून आलो आहे आणि यावेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायला हवेत. शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात ओला दुष्काळ पाहणी दौरा केला असून पाहणी दौरा झाल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली असून मला शेतीतलं काही कळंत नाही, पण त्याच्या डोळ्यातील अश्रू दिसत आहेत, हेकेखोरांना सेना सरळ करेल; विमा कंपन्यांनी माणुसकीनं वागावे. बँकांनी शेतकऱ्यांना नोटीसा पाठवणे ताबडतोब थांबवावे. माझ्या राज्यातील बळीराजाला संकटातून मोकळं करण्यासाठी केंद्राकडून मदत हवी असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. पाहणी दौरा हा हेलिकॉप्टरमधून करण्याचा दौरा नसतो; परिस्थितीवर मात करणं गरजेचं असल्याचे म्हणत उद्धव ठाकरेंनी पुन्हा फडणवीसांना टोला लगावला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray Press Conference after he Meet rain affected farmers