मविआ अखेर कोसळलं, वाचा उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ७ महत्त्वाचे मुद्दे

uddhav thackeray resigns as a chief minister of maharashtra read key points of his final speech maharashtra politics
uddhav thackeray resigns as a chief minister of maharashtra read key points of his final speech maharashtra politicsesakal

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राजीनामा दिला असून महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळलं आहे, या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह येत त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. या वेळी अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं.

शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि संभाजीनगर नामांतर

सरकार म्हणून आपण काय केला आपण काय केलं तर सुरूवातच आपण छत्रपती शिवरायांच्या रायगडला निधी देऊन ते काम पुढं चालू ठेवण्यासाठी सुरूवात केली. नंतर इतके दिवस आपण जे बोलत होतो सेतकऱ्यांना कर्जमुक्त ते बळीराजाला आपण कर्जमुक्त केलं. मला समाधान आहे की आम्ही औरंगाबादचे अधिकृतपणे संभाजी नगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केले आहे. स्वत: शिवसेनाप्रमुखांनी जे नाव ठेवलं ते नाव आपण संभाजीनगरला दिलं असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हा निर्णय घेतल्याचा आनंद झाल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

शरद पवार, सोनिया गांधींचे आभार

एखादी गोष्ट चांगली सुरु असली की दृष्ट लागली. शरद पवार, सोनिया गांधी या सहकार्याना धन्यवाद. शिवसेनेची चारच मंत्री आज होते कुणीही विरोध केला नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी मला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानू इच्छितो. शिवसेनेचे अनिल परब, सुभाष देसाई आणि आदित्य ठाकरे, हे लोक प्रस्ताव मंजूर झाले तेव्हाच उपस्थित होते, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनीही प्रस्तावाला पाठिंबा दिला. अशोक चव्हाण म्हणाले, हवं तर आम्ही सरकारमधून बाहेर पडतो आणि बाहेरून पाठिंबा देतो. कुणीही विरोध केला नाही. ज्यांनी करायचे होते ते नामानिराळे ज्यांचा विरोध भासवला त्यांनी समर्थन दिले, असं ठाकरे यावेळी म्हणाले.

पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसेन

मी अनपेक्षित पद्धतीने (सत्तेवर) आलो होतो आणि त्याच पद्धतीने मी बाहेर पडत आहे. मी कायमचा दूर जाणार नाही, इथेच राहणार आणि पुन्हा एकदा शिवसेना भवनात बसेन. मी माझ्या सर्व लोकांना एकत्र करीन असे सांगतत मी मुख्यमंत्री आणि आमदार पदाचा राजीनामा देत आहे असे ठाकरे यावेळी म्हणाले.

uddhav thackeray resigns as a chief minister of maharashtra read key points of his final speech maharashtra politics
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंचा राजीनामा, महाराष्ट्रात सत्ताबदल अटळ

शिवसैनिकांनी आमदारांच्या आडवे येऊ नये

यावेळी त्यांनी राज्यात कोणत्याही शिवसैनिकांनी गोंधळ घालू नये असे आवाहन केले आहे. उद्या कोणत्याही शिवसैनिकांनी अस्तित्वात येणाऱ्या नव्या सरकारच्या मधे येऊ नये त्यांना त्यांचा गुलाल उधळू द्या असे म्हटले आहे. उद्या नव्या लोकशाहीचा पाळणा हलतोय. हा सोहळा जबरदस्त झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही येणार नाही. तुम्ही या आणि घ्या शपथ, असेही ठाकरेंनी सांगितलं.

सत्तेसाठी आम्ही हपापलेले नाही

आम्ही हपालेले होऊन जात नाही, मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊन घेऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय, असे उध्दव ठाकरे म्हणाले.

uddhav thackeray resigns as a chief minister of maharashtra read key points of his final speech maharashtra politics
नव्या सरकारमध्ये CM फडणवीस तर एकनाथ शिंदे अर्थमंत्री? बंडखोरांतील २० जण होतील मंत्री

जाता-जाता राज्यपालांना टोला

विरोधकांनी पत्र देताच कोर्टानं 24 तासाच्या आत निकाल दिला. मात्र, राज्यापालांनी 12 आमदारांचा निकाल काही दिला नाही, लोकशाहीचा मान राखल्याबद्दल राज्यपालांचे आभार असे म्हणत त्यांनी कोश्यारींना टोला लगावला.

अवाहन करूनही मातोश्रीवर आले नाहीत

मी बंडखोरांना मातोश्रीत येऊन बोलण्याचं आवाहन करूनही गुवाहाटीला गेलेले आमदार माझ्यासमोर आले नाहीत, असेही ठाकरे यावेळी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com