esakal | मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही; तर....
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav-Thackeray

‘त्यांना दिल्लीचीच चिंता’
उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोले लगावले. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदार निधी दिल्लीत दिला आहे. ते सर्व गोष्टी दिल्लीतच करत आहेत. त्यांना दिल्लीचीच चिंता आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दिल्ली भेटीवर कोपरखळी लगावली. ही वेळ राजकारण करण्याची नसून एकदिलाने काम करण्याची असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही; तर....

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राममंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेले विधान रास्त असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानाबाबत त्यांनी मत व्यक्त केले. ‘अयोध्येत राम मंदिर उभे राहत आहे, मात्र देशाला कोरोनाची चिंता जास्त आहे. तसेच मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही.

'अभ्यासक्रम कमी केला, तशी 'फी' पण कमी करा'; शिक्षणमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

त्यासाठी डॉक्टर लागणार आहे,’ असे पवार म्हणाले होते. यावर उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार म्हणत आहेत ते बरोबर आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे. आपण ज्या सुविधा निर्माण करतोय त्या कोरोना बरा करणार नाहीत. आपल्याला त्यासोबत डॉक्टर हवे आहेत.
 
‘त्यांना दिल्लीचीच चिंता’
उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोले लगावले. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील आमदार निधी दिल्लीत दिला आहे. ते सर्व गोष्टी दिल्लीतच करत आहेत. त्यांना दिल्लीचीच चिंता आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्या दिल्ली भेटीवर कोपरखळी लगावली. ही वेळ राजकारण करण्याची नसून एकदिलाने काम करण्याची असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Edited By - Prashant Patil