पंतप्रधानांच्या गुलाम निवडणूक आयुक्तांनी चिन्ह देवून..; संतापलेल्या ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप I Shiv Sena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray

मी कुठं खचललो नाही, मी कुठं खचणारही नाही. माझा पक्ष तुम्ही आहात, तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे.

Shiv Sena : पंतप्रधानांच्या गुलाम निवडणूक आयुक्तांनी चिन्ह देवून..; संतापलेल्या ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप

Maharashtra Politics : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगानं दिलंय. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.

निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिलाय. शिवसेना हे नाव एकनाथ शिंदेंना दिलं, त्याशिवाय पक्षाचं चिन्ह धनुष्यबाण हेही एकनाथ शिंदेंना देण्यात आलं आहे.

याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गाडीच्या टपावर उभं राहून शिंदे गटाला खुलं आव्हान दिलंय. उद्धव ठाकरे म्हणाले, ज्यांनी धनुष्यबाण चोरलंय ते मर्द असतील, तर त्यांनी चोरलेलं धनुष्यबाण घेऊन निवडणुकीला सामोरे यावं, मी मशाल घेऊन येतो. धनुष्यबाण चिन्ह चोरायला सुध्दा मर्द लागतो. रावणानं सुध्दा शिवधनुष्य उचलण्याचा प्रयत्न केला, काय घडलं? उताणा पडला. तसंच हे चोर आणि चोरबाजाराचे मालक शिवधनुष्य पेलताना उताणे पडल्याशिवाय राहणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.

मी कुठं खचललो नाही, मी कुठं खचणारही नाही. माझा पक्ष तुम्ही आहात, तुमच्या ताकदीच्या जोरावर मी उभा आहे. गेल्या 75 वर्षात असं कधीच घडलं नाही. काँग्रेस सुध्दा फुटली होती. काँग्रेसचं चिन्ह देखील गोठवलं गेलं होतं. मात्र, दुसऱ्या गटाला ते दिलं नव्हतं. समाजवादी पार्टीबाबतही असंच घडलं. जयललिता आणि जानकी रामचंद्रन यांच्यामधला वाद मिटला म्हणून, ते चिन्ह त्यांना मिळालं; पण जेव्हा जेव्हा वाद झाला, तेव्हा कोणत्याही एका गटाला मूळ चिन्ह अथवा मूळ नाव दिलेलं नाही. मात्र, पंतप्रधानांच्या गुलाम निवडणूक आयुक्तांनी ते केलं आहे, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.