उद्धव यांच्या उपस्थितीवरून शिवसेनेत दोन मते

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

मुंबई - शिवस्मारकाच्या भूमिपूजन समारंभाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहावे काय, यावरून शिवसेनेत दोन वेगवेगळी मते होती, असे समजते. भाजपचे नेते सापत्न वागणूक देत असताना तेथे हजर राहण्यात अर्थ नाही, असे सेनेतील जहाल गटाचे मत होते. मात्र महापालिका निवडणुकीच्या तोंडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंबंधीच्या कार्यक्रमाला हजर राहणे हे भाजपचा सहकारी म्हणून नव्हे तर शिवसेनेची बांधिलकी म्हणून आवश्‍यक असल्याचा विचार प्रभावी ठरला.

मुंबई महापालिकेत भाजप युती करणार नाही, विधानसभेप्रमाणेच ऐनवेळी युती करता येणार नाही, असा सांगावा मिळण्याची शक्‍यता शिवसेनेत गृहीत धरली जात आहे. भाजपने त्यासाठी संपूर्ण तयारी केली आहे असे मानले जाते. वरवर मैत्री आहे असे दाखवत स्वतंत्रपणे लढण्याची तयारी भाजपने केली असल्याने त्यांच्या मंचावर जाऊ नये अशी शिवसेनेतील काही वरिष्ठ नेत्यांची सूचना होती. मराठी माणूस तसेच शिवसेनेचे महत्त्व यांच्या आधारावर निवडणूक जिंकण्याची तयारी करणाऱ्या भाजपविरोधी गटाची ही रणनीती होती. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणे असा या अनुपस्थितीचा अर्थ घेतला जाईल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावरून राजकारण नको, हा विचार प्रभावी ठरल्यामुळे आता उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. जहाल गटाच्या भावना खऱ्या असल्या तरी त्या या वेळी व्यक्‍त करणे उचित होणार नाही, या विचाराला उद्धव यांनी महत्त्व दिल्याचे समजते.

Web Title: uddhav thackeray shiv sena disturb