Uddhav Thackeray : इकडे 'मविआ'ने रणशिंग फुंकले अन् तिकडे उद्धव ठाकरेंचे विश्वासू शिंदे गटात

 Uddhav Thackeray
Uddhav Thackeray esakal

मुंबई - राज्यातील विधानसभा निवडणुकीला जेमतेम एक वर्ष शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर सत्तेतून अनपेक्षितपणे बाहेर पडलेल्या महाविकास आघाडीने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सध्या शिवसेनेची वाताहत झाली असून पक्षचिन्हासह अख्खा पक्ष भाजपसोबत असताना उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज महाविकास आघाडीच्या बैठकीत निवडणुकीचे रणशिंग फुंकले. पण त्याचवेळी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

 Uddhav Thackeray
Shivsena News: 'ह्याच माणसाने माझ्याकडे भाजपची तक्रार केली होती अन्...'; उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

ठाकरे गटातील नेते आणि माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत शिवसेनेत अर्थात शिंदेगटात प्रवेश करणार आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. याआधी सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

बाळासाहेब भवन येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. याआधी दीपक सावंत यांनी विधान भवनात जावून भेट घेतली होती. आमदारकीची टर्म संपल्यापासून सावंत पक्षात दुर्लक्षित झाले होते.

 Uddhav Thackeray
Shiv Sena Symbol Row : शिवसेना नाव अन् चिन्ह शिंदे गटाला का दिलं? निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात सांगितलं

दुसरीकडे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज महाविकास आघाडीची बैठक घेऊन महाराष्ट्रातील विविध भागात सभा घेण्याचं नियोजन केलं आहे. मात्र त्याआधीच उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com