नको ते मतदारांनी नाकारलं, उखडून फेकलं : उद्धव ठाकरे

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

मुंबई : जे नको ते मतदारांनी नाकारले. चार राज्यांत परिवर्तन घडविणाऱ्या निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ईव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी आणि त्याहीपेक्षा पर्याय कोण? या फालतू प्रश्नांत गुंतून न पडता जे आधी नकोत त्यांना आधी नाकारले, उखडून फेकले, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सांगितले.

तेलंगणा, मध्यप्रदेश, मिझोराम, छत्तीसगड आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीचे समोर येत आहेत. या निवडणुकीत काँग्रेस आघाडीवर असून, भाजप पिछाडीवर आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सांगितले, की ''ईव्हीएम, पैसावाटप, गुंडागर्दी आणि त्याहीपेक्षा पर्याय कोण? या फालतू प्रश्नांत गुंतून न पडता जे आधी नकोत त्यांना आधी नाकारले, उखडून फेकले. पुढचे पुढे काय ते बघू. हेच खरे धाडस आहे. मतदारांच्या धाडसाने देशाला दाखविलेलीही दिशा आहे. जे नको ते मतदारांनी नाकारले. चार राज्यांत परिवर्तन घडविणाऱ्या निर्भय मतदारांचे मी अभिनंदन करतो''. 

दरम्यान, युतीतील सर्व सोडून चालले आहेत. असे असले तरीदेखील शिवसेना आजही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आहे. जनतेने भाजपला धडा शिकवला आहे, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले होते. 

Web Title: Uddhav Thackeray slams BJP After their defeat in Five States