Thackeray Vs Shinde : अखेर अटक झालेल्या ठाकरे समर्थकांची सुटका

uddhav thackeray supporters arrested after clash with shinde faction released shivsena prabhadevi
uddhav thackeray supporters arrested after clash with shinde faction released shivsena prabhadevi esakal
Updated on

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : महाराष्ट्रात शिंदे विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील लढत अजून संपलेली दिसत नाही. आता मुंबईतील दादरमध्ये गणेश विसर्जनाच्या वेळी दोन गटात हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आङे. मुंबईतील प्रभादेवी परिसरात शुक्रवारी रात्री दोन्ही गट आमने-सामने आले होते. यादरम्यान शिंदे गटाचे सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. दोन्ही गटाच्या समर्थकांमध्ये झालेल्या मारामारीप्रकरणी पोलिसांनी एकूण 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.

गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान काल शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. याचं रुपांतर मारहाणीत झालं, या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली होती, त्यांची आज जामीनावर सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान या हाणामारीत उद्धव ठाकरे गटातील अनेक कार्यकर्त्यांना अटकही झाली होती. ज्यांना नंतर सोडून देण्यात आले. मुंबई पोलिसांनी सांगितले की, आयपीसीच्या कलम 395 सह विविध कलमांतर्गत अटक करण्यात आलेल्या शिवसेनेच्या 5 जणांना एफआयआरमधून कलम-395 काढून दिलासा देण्यात आला आहे, इतर सर्व कलमे जामीनपात्र आहेत.

असा आरोप शिंदे गटाने केला

गणेश विसर्जन मिरवणुकीत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर हल्ला केला आणि धमक्या दिल्याचा दावा शिंदे गटाचे नेते संतोष तेलवणे यांनी केला. दरम्यान, शिंदे गटातील एका नेत्याने महेश सावंत यांच्यावर गोळीबार केल्याचा ठाकरे गटाचा दावा आहे.

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे जूनमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले. एमव्हीए सरकार पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तेव्हापासून खऱ्या शिवसेनेसाठी दोन्ही गटात लढत सुरू आहे.

uddhav thackeray supporters arrested after clash with shinde faction released shivsena prabhadevi
गोळीबार केल्याचा आरोपांवर सदा सरवणकरांची प्रतिक्रिया, म्हणाले..

हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे

खरी शिवसेना आमची असल्याचे शिंदे गटाचे म्हणणे असून त्यासाठी त्यांनी पक्षाच्या निवडणूक चिन्हावरही दावा केला आहे. दुसरीकडे ठाकरे गट म्हणतो की, त्यांची ती खरी शिवसेना आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात पक्षाच्या दाव्यावरून सुरू असलेल्या संघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुरू आहे.

uddhav thackeray supporters arrested after clash with shinde faction released shivsena prabhadevi
Shivsena Mumbai: शिंदे - ठाकरे गटात प्रभादेवीत नक्की काय घडलं? तक्रारदार तेलवणेंनी सांगितला घटनाक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com