

Uddhav Thackeray
esakal
मुंबई - ‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर पहिल्यांदाच राजकीय पक्षांची अशी एकजूट झाली आहे. मुंबईत मतचोरी करणाऱ्यांच्या विरोधात आज नुसती ‘ठिणगी’ बघताय पण या ठिणगीचा कधीही वणवा होऊ शकेल, याची नोंद ठेवा,’ असा खणखणीत इशारा शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज सत्ताधारी भाजप आणि कथित मतचोरीला पाठीशी घालणाऱ्या निवडणूक आयोगाला दिला. महाविकास आघाडीतील विविध पक्ष आणि समविचारी संघटनांनी काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’ प्रसंगी ते बोलत होते.