esakal | एक तारखेला नाहीतर 'या' तारखेला होणार उद्धव ठाकरेंचा शपथविधी
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray will take oath as CM on 28th November

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे १ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र विकास आघाडीने हा निर्णय बदलला असून त्यांचा शपथविधी आता २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ : ०० वाजता होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली.

एक तारखेला नाहीतर 'या' तारखेला होणार उद्धव ठाकरेंचा शपथविधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हे १ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, महाराष्ट्र विकास आघाडीने हा निर्णय बदलला असून त्यांचा शपथविधी आता २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ : ०० वाजता होणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांना दिली. उद्धव ठाकरे यांचा शपथविधी हा शिवतीर्थावर होणार असल्याची माहितीही थोरात यांनी दिली.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावाही केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. आमदारांच्या सह्यांचे पत्रही राज्यपालांना दिले असल्याचे पाटील यांनी सांगितले. केवळ उद्धव ठाकरे यांचाच शपथविधी त्या दिवशी होणार असल्याची माहिती देण्यात आली.

दिवसभरातील मिनीट टू मिनीट राजकीय घडामोडी वाचा सविस्तर

दरम्यान, मंत्रिमंडळात कोण असेल हे माहित नसून आता शरद पवार यांच्या निवस्थानी आपण जाणार असून तिथे अजित पवार आलेले असल्याची माहिती असून आपण त्यांच्याच भेटीसाठी सिल्वर ओकवर निघालो असल्याचे पाटील यांनी सांगितले. दीड तासापासून अजित पवार हे शरद पवार यांच्या निवासस्थानी असल्याचेही पाटील म्हणाले.

loading image