Shivsena: 'धनुष्यबाण' कोणाचा? ठाकरे गटाकडून दोन ट्रक भरुन शपथपत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray

Shivsena: 'धनुष्यबाण' कोणाचा? ठाकरे गटाकडून दोन ट्रक भरुन शपथपत्र

Uddhav Thackeray: निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटांकडून कागदपत्रांची लढाई सुरु झालेली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे दोन ट्रक भरुन शपथपत्र दाखल केले.

'खरी शिवसेना कोणाची?' हा वाद कायम आहे. सध्या उद्धव ठाकरे गटाला मिळालेलं नाव आणि चिन्ह हे केवळ अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीपुरतं आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला ''शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे'' हे नाव मिळालं. तर चिन्ह 'मशाल' मिळालं. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं असून 'ढाल-तलवार' हे चिन्ह मिळालं आहे.

हेही वाचा: Jaydutt Kshirsagar: 'ते' कधीच शिवसेनेत रमले नाहीत; फक्त तिकीट मिळवण्यासाठी क्षीरसागरांनी...

निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्याने निडणूक आयोगाकडे कागदपत्रांची लढाई सुरु आहे. शिंदे गटानेदेखील अडीच लाख शपथपत्र दाखल केलेले असून साडेसात लाख शपथपत्र दाखल करणार असल्याचं सांगितलं. आहे.

आज उद्धव ठाकरे गटाच्या वतीने दिल्लीत निवडणूक आयोगाकडे दोन ट्रक भरुन शपथपत्र दाखल केलेले आहेत. तब्बल साडेआठ लाख शपथपत्र असल्याचं ठाकरे गटाने सांगितलं. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात आपल्या बाजूने किती पदाधिकारी आहेत, याची माहिती देण्यात आलीय. त्यामुळे आता एवढी कागदपत्रं तपासून निर्णय द्यायला निवडणूक आयोगाला किती वेळ हे तर नक्की!