उद्धव ठाकरेंनी एखादी विमा कंपनी सुरू करावी- चंद्रकांत पाटील

वृत्तसंस्था
गुरुवार, 10 जानेवारी 2019

विमा कंपन्यांना नुकसानीनुसार प्रत्येक जिल्ह्यात कमी अधिक नुकसान द्यावे लागते. ज्यांनी आरोप केलेत त्यांनी एक विमा कंपनी सुरू करावी असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेशी युतीची बोलणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

सांगली- भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (ता.09) पिकविम्यावरून बीडमध्ये केलेल्या आरोपांना उत्तर दिले आहे. विमा कंपन्यांना नुकसानीनुसार प्रत्येक जिल्ह्यात कमी अधिक नुकसान द्यावे लागते. ज्यांनी आरोप केलेत त्यांनी एक विमा कंपनी सुरू करावी असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. पीक विम्याच्या वाटपात कुठेही भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.
 
आम्ही शेवटपर्यंत शिवसेनेशी युतीची बोलणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढली पाहिजे. मात्र, भाजप-सेनेने एकत्र लढावे या मताचा मी असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे एकत्र निवडणुका लढाव्याव्यात यासाठी मी शिवसेनेला आवाहन करतो. शिवसेना आणि भाजप पांडव आणि कौरव नाहीत. आम्ही दोघेही पांडवच आहोत, त्यामुळे दोघांनी एकत्र लढणे हेच योग्य ठरणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

आम्ही सध्या दुष्काळावरच बोलत आहोत. मात्र, वेळ आली आहे ती युतीवर बोलण्याची असा चिमटाही त्यांनी शेवटी शिवसेनेला काढला.

Web Title: Uddhav Thackrey Shoud Open Insuranece Company Says Chandrakant patil