साताऱ्यात भाजपकडून उदयनराजेंचे नाव जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

- भाजपची 125 उमेदवारांची यादी जाहीर
- सातारा लोकसभा पोटनिवडणूकीची घोषणा
- उदयनराजे भोसले यांना भाजपची उमेदवारी जाहीर

नवी दिल्ली : विधानसभा निवडणूकीसाठी सत्तारूढ भाजपच्या लांबत गेलेल्या यादीला अखेर आज मुहूर्त मिळाला. पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंग यांनी दिल्लीतील राष्ट्रीय मुख्यालयात आज दुपारी 1 च्या सुमारास भाजपची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये 125 उमेदवारांचा समावेश आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूकीसाठी अलीकडेच भाजप मध्ये आलेले उदयनराजे भोसले यांना अपेक्षेप्रमाणे भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे.

Vidhan Sabha 2019:भाजपची 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर 

उदयनराजे भोसले यांनी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांनी प्रवेशापूर्वीच विधानसभेसोबतच लोकसभा पोटनिवडणूक घेण्यात यावी अशी मागणी केली होती. अखेर त्यांची मागणी मान्य करण्यात आली असून त्यांना सातारा लोकसभा पोटनिवडणूकीसाठी भाजपची उमेदवारी जाहीर झाली आहे.

29 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याही उपस्थित बैठक झाली होती.

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: UdyanaRaje Bhosale declared as BJP candidate from Satara for Loksabha by polls 2019