...अन् मुख्यमंत्र्यांनी जोडले उदयनराजेंना हात (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 डिसेंबर 2018

उदयनराजेना मुख्यमंत्र्यानी हात थांबवून हात जोडल्याचे आज (ता.23) पहायला मिळाले. त्याचे झाले असे की, आज साताऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी उदयनराजे उपस्थित होते.

सातारा: उदयनराजेना मुख्यमंत्र्यानी हात थांबवून हात जोडल्याचे आज (ता.23) पहायला मिळाले. त्याचे झाले असे की, आज साताऱ्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी उदयनराजे उपस्थित होते.

यावेळी मराठा आरक्षणाचा धाडसी निर्णय या सरकारने घेतला. सध्याचा सरकारकडे इच्छाशक्ती आहे. माझ्या मतदारसंघासह इतर मतदारसंघात कामे सुरू असून त्याची पोचपावती लोक त्यांना देतील, असे विधान करून खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजप सरकारचे उदोउदो केले. त्यांचे भाषण पूर्ण होऊन ते असनाकडे निघाले तेव्हा खुश झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळ्या वाजत त्यांना थांबवून हात जोडून नमस्कार केला.

मराठा आरक्षणाचा निर्णय मागेच लागायला पाहिजे होता. पण, का लागला नाही याविषयी मी काही बोलणार नाही. इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो. या सरकारने माझ्या मतदारसंघासह ठिकठिकाणी केलेल्या कामांची पोहचपावती त्यांना नागरिक देतील अशी मला खात्री आहे. बोलण्यापेक्षा करणे हे महत्त्वाचे असते. समाजाचे हित जोपासतात त्यांनाच नागरिकांचा पाठिंबा मिळतो. मराठा आरक्षणाचा अत्यंत धाडसी निर्णय भाजपने घेतला. या केलेल्या कामाची पोहच पावती लोक नक्की देतील, असेही उदयनराजे यावेळी म्हणाले.

Web Title: Udyanraje Bhosale Praise BJP Government On Maratha Reservation