''घराघरात शिवचरित्र पोहचविणारे बाबासाहेब...'' उदयराजेंनी केल्या भावना व्यक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

udyanraje bhosale

घराघरात शिवचरित्र पोहचविणारे बाबासाहेब... उदयनराजेंचे दु:ख व्यक्त

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

मुंबई : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (babasaheb purandare passes away) यांचे पुण्यात आज निधन झाले. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात बाबासाहेब पुरंदरेंवर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे एक पर्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. खासदार उदयनराजे भोसले (udyanraje bhosale) यांनी देखील सोशल मिडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त केले.

उदयनराजे भोसलेंची सोशल मिडियावर पोस्ट करत दु:ख व्यक्त

इतिहास अभ्यासक, चरित्रकार, व्याख्याते, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत याचे दुःख होत आहे. महाराष्ट्रात प्रत्येक घराघरात शिवचरित्र पोहाचवण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. आम्ही पुरंदरे कुटुंबियांच्या दुःखात व्यक्तीश: आणि तमाम शिवप्रेमींच्या वतीने सहभागी आहोत.

हेही वाचा: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन

बाबासाहेब पुरंदरे 100 वर्षांचे होते. साडे आठ वाजता पार्थिव पर्वती इथल्या निवासस्थानी ठेवण्यात येईल आणि सकाळी साडे दहा वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

हेही वाचा: "आम्हाला शिवराय खऱ्या अर्थाने बाबासाहेबांमुळेच समजले"

loading image
go to top