

बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाची सुनावणी येथील विशेष मकोका न्यायालयात गुरुवारी (ता. दहा) झाली. सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर या प्रकरणातील मारहाणीचा व्हिडिओ सादर केला. पुढील सुनावणी २४ एप्रिलला होणार आहे.