असह्य उकाड्याने विजेची मागणी वाढली! सोलापूर जिल्ह्यात दररोज 1 हजार 280 मेगावॅट विजेचा खप; घरगुती ग्राहकांकडून वीजेचा सर्वाधिक वापर

सध्या उन्हाचा पारा सरासरी ४३ ते ४४ अंशापर्यंत कायम आहे. घरगुती ग्राहकांसह अनेक शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये ‘एसी’चा वापर वाढला आहे. दुसरीकडे पंखे, कुलर तर प्रचंड प्रमाणात सुरू आहेत. दिवस-रात्र ते बंदच नाहीत, अशीही स्थिती आहे.
 light bill
light billSakal

सोलापूर : सध्या उन्हाचा पारा सरासरी ४३ ते ४४ अंशापर्यंत कायम आहे. शहरातील घरगुती ग्राहकांसह अनेक शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये ‘एसी’चा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दुसरीकडे पंखे, कुलर तर प्रचंड प्रमाणात सुरू आहेत. दिवस-रात्र ते बंदच नाहीत, अशीही स्थिती पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढत असून सध्या सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये दररोज १२८० मेगावॅट वीज लागत आहे.

जिल्ह्यातील बार्शी, करमाळा, माळशिरस, माढा व सांगोला या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून उर्वरित तालुक्यांमध्येही दुष्काळाची दाहकता वाढत आहे. जमिनीतील पाणीपातळी खालावल्याने कृषी पंपासाठी वीजेचा वापर वाढला असून उन्हाळ्यामुळे पिकांना वारंवार पाणी द्यावे लागत असल्याचीही स्थिती आहे. दुसरीकडे तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने घराबाहेर फिरणे कठीण झाले आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी जिल्हाभरात कूलरची विक्री वाढली असून घराघरांत टेबल फॅन दिसत आहेत. अनेकांनी घरात एसी बसवून घेतले आहेत. एटीएम केंद्रे, बॅंका, इलेक्ट्रॉनिक्स दुकाने, साडी सेंटर, कापड दुकानांसह सराफ दुकानांमधील एसी, पंखे दिवसभर सुरूच ठेवावे लागत आहेत.

जिल्ह्यात महावितरणचे ११ लाख ३५ हजारांवर ग्राहक असून त्यात घरगुती ग्राहकांची संख्या साडेसहा लाखांपर्यंत आहे. सध्या शेतीच्या तुलनेत घरगुती ग्राहकांनाच सर्वाधिक वीज लागत असून जिल्ह्यातील एकूण ग्राहक फेब्रुवारीच्या तुलनेत सध्या ६४ ते ७० मेगावॅट वीज जास्त वापरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोलापूरची तीन महिन्यातील विजेची मागणी

  • महिना विजेची मागणी

  • फेब्रुवारी १,२१६ मेगावॅट

  • मार्च १,२२५ मेगावॅट

  • एप्रिल १,२८० मेगावॅट

‘महावितरण’चे ग्राहक

  • घरगुती ग्राहक

  • ६,४०,३१६

  • कृषी पंपांचे ग्राहक

  • ३,९५,५६९

  • इतर ग्राहक

  • ९९,६८२

  • एकूण ग्राहक

  • ११,३५,५६७

जिल्ह्यात कोठेही नाही लोडशेडिंग

सोलापूर शहर असो वा ग्रामीण भागात सध्या कोणत्याच ठिकाणी लोडशेडिंग केले जात नाही. मागणीच्या प्रमाणात वीज पुरवठा केला जात असल्याची माहिती प्रभारी अधीक्षक अभियंता संजय शिंदे यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता पाहता उन्हाळ्यात पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नदी काठावरील वीज सहा तास तर बंधाऱ्यांजवळील वीजपुरवठा दोन तास करण्यात आला आहे, पण अन्य ठिकाणी पूर्वीप्रमाणेच वीजपुरवठा होत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com