‘युनिफाइड डीसी रूल’ राज्यामध्ये लागू; काय आहे नियमावली वाचा

Unified-DC-Rule
Unified-DC-Rule

मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण वगळले; हद्दीलगत मात्र निर्बंध कायम
पुणे - मुंबई आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) वगळता संपूर्ण राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी ‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीस’ (युनिफाइड डीसी रूल) राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली होती. मात्र त्याबाबतचा आदेश शुक्रवारी काढण्यात आल्यामुळे आजपासून ही नियमावली सर्वत्र लागू करण्यात आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुमारे दोन वर्षांपासून ही नियमावली राज्य सरकारकडे मंजुरीसाठी प्रलंबित होती. ती मान्य करावी, यासाठी क्रेडाई, मराठी बांधकाम व्यावसायिक संघटनेसह विविध संघटनांकडून मागणी केली जात होती. अखेर त्यास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली. पीएमआरडीए, मुंबई शहर, एमआयडीसी, नैना क्षेत्र, पोर्ट ट्रस्ट, हिल स्टेशन नगरपरिषदा व इको सेन्सिटिव्ह झोन वगळता संपूर्ण राज्यभर ही नियमावली लागू झाली आहे. एकात्मिक नगर वसाहती, ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट (टीओडी झोन), झोपडपट्टी पुनर्वसन योजना, प्रधानमंत्री आवास योजना व अफोर्डेबल हाउसिंग प्रकल्प यांना देखील ही नियमावली फायदेशीर ठरणार आहे.

यापूर्वी ही नियमावली पीएमआरडीएच्या हद्दीला देखील लागू करण्यात येणार होती. मात्र अंतिम नियमावलीत पीएमआरडीएला वगळण्यात आले आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात ही लागू असताना या दोन्ही शहरांच्या हद्दीलगत असलेल्या भागात मात्र ती लागू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com