
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज 23 डिसेंबर रोजी मोठा निर्णय घेतला आहे. 'नो डिटेन्शन पॉलिसी' रद्द करण्यात आली आहे. आता इयत्ता 5वी आणि 8वीच्या वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी पुढील वर्गात जाऊ शकणार नाहीत. यापूर्वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करून पुढील वर्गात पदोन्नती दिली जात होती. मात्र आता असे होणार नाही. नापास झालेल्या विद्यार्थ्यांना दोन महिन्यांत पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल. विद्यार्थी पुन्हा अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पदोन्नती दिली जाणार नाही.