'हम आपके साथ हैं', अमित शहांचा राणेंना फोन

काय चर्चा झाली दोघांमध्ये?
Amit Shah
Amit ShahSakal
Updated on

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ठिकठिकाणी नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांकडून (shivsena) हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहेत. शिवसेना अशा पद्धतीने आक्रमक झालेली असताना भाजपाकडून नारायण राणे यांच्या समर्थनार्थ कोणी समोर आल्याचं दिसत नव्हतं.

पण आता खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नारायण राणेंना फोन केला. नेमकं काय घडलं? ते सर्व त्यांच्याकडून समजून घेतलं व हम आपके साथ हैं असा शब्द दिला. त्यामुळे नारायण राणेंची जनआशिर्वाद यात्रा थांबणार नसून ती सुरुच राहणार आहे. आता थेट अमित शहांनी नारायण राणेंची पाठराखण केल्यामुळे हा संघर्ष आता राणे विरुद्ध शिवसेना असा न राहता, केंद्र विरुद्ध राज्य होण्याची शक्यता आहे.

Amit Shah
नारायण राणेंना अटक होऊ शकते?, काय सांगतो कायदा

नारायण राणेंविरोधात राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. राज्य सरकारकडून राणेंच्या अटकेची तयारी सुरु आहे. पण आपण काहीही गुन्हा केलेला नाही, असे राणेंनी म्हटलं आहे. अमित शहा आता थेट राणेंच्या बाजूने बोलल्याने पुढे काय होणार? पुढे हा संघर्ष कशा पद्धतीने जाणारे, ते लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com