हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एक होऊ; नितीन गडकरींना विश्वास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे वक्तव्य केले होते.

मुंबई : सत्तावाटपावरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे. यावरून दररोज खलबतं होत असताना आता या चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. याविषयावर आता केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी आपले मत व्यक्त केले. 

गडकरी म्हणाले, 'ज्यावेळी बाळासाहेब शिवसेनेचे नेतृत्व करायचे, त्यावेळी त्यांनी म्हटले होते की, ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील, त्यांचा मुख्यमंत्री होईल. यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे 105 आमदार निवडून आले आहेत. शिवसेनेपेक्षा आमचे जास्त आमदार निवडून आले असल्यामुळे आमचाच मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट आहे. 

- राजीनामा दिल्यानंतरही फडणवीसच मुख्यमंत्री

मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमच्यासाठी सर्व पर्याय खुले आहेत, असे वक्तव्य केले होते. हे भाजप-सेना युतीसाठी अनुकूल नव्हते. 

- युती तुटलेली नाही, चर्चेचे दरवाजे खुले : फडणवीस

त्याअगोदर भाजप-सेनेमध्ये जे काही बोलणे झाले होते, त्यावेळी 50-50 चा विषय झाला नव्हता. ना अडीच वर्षाच्या प्रस्तावावर काही बोलणे झाले होते. विधानसभा निवडणुकीनंतर बोलू असे ठरले होते. मात्र ते सध्या चर्चेस तयार नाहीत. चर्चेसाठी भाजपचे दारे खुली असून भाजप सर्व गोष्टींचे स्वागत करेन.  

- TET Exam : विद्यार्थ्यांनो, परीक्षेची तारीख ठरली; ऑनलाईल अर्ज करा दाखल!

शिवसेनेने आघाडीसोबत जाणे हे अनैसर्गिक आहे. युती ठेवायची की नाही हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे. मात्र, सेना-भाजप युतीतच राज्याचं हित आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन भाजप-सेनेनं सरकार बनवावं, अजूनही वेळ गेलेली नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Minister and BJP leader Nitin Gadkari made a statement regarding BJP and Shiv Sena alliance