'यूपीएससी'च्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा केंद्राबाबत आयोगाचा मोठा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

लाॅकडाऊन काळात अनेक विद्यार्थी दिल्ली सोडून त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. त्यामुळे त्यांनी परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्याची मागणी केली होती.

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) परीक्षा केंद्र बदलण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी देशभरातील विद्यार्थी करत असल्याने अखेर त्याची दखल घेण्यात आली आहे. दोन टप्प्यात केंद्र बदलण्यासाठी लिंक ओपन असणार आहे. तसेच जागेच्या उपलब्धेनुसार परीक्षा केंद्र मिळणार आहे. 

७ ते १३ जुलै आणि २० ते २४ जुलै या दरम्यान उमेदवारांना केंद्र बदलता येणार असून, सर्वांत आधी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना सर्वांत आधी केंद्र बदलून मिळणार आहे. जो सर्वात आधी अर्ज करेल त्याला आधी केंद्र बदलून मिळणार आहे. 

- पुणे मेट्रोच्या 'या' मार्गावर टीओडी झोन लागू; काय आहे हा टीओडी झोन?

यूपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा आणि वनसेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. लाॅकडाऊन काळात अनेक विद्यार्थी दिल्ली सोडून त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. त्यामुळे त्यांनी परीक्षा केंद्र बदलण्याची मुभा देण्याची मागणी केली होती. त्यास आयोगाने मान्यता दिली आहे. 

यामध्ये परीक्षा केंद्रांची उपलब्ध किती आहे, क्षमता किती आहे याचा विचार केला जाणार असून, त्यानंतर किती  उमोदवारांच्या अर्जांना मान्यता दिली जाईल. 

कोरोना झाला आमदारांना...ग्रामस्थांचा जीव टांगणीला

केंद्र बदलण्यासाठी ७ ते १३ जुलै आणि २० ते २४ जुलै अशा दोन टप्प्यांत उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. केंद्राची क्षमता पूर्ण झाल्यास ते केंद्र मिळणार नाही. तसेच १ ते ८ ऑगस्ट दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेणार आहे. मात्र एकदा अर्ज मागे घेतल्यास तो पुन्हा भरता येणार नाही. या संदर्भातील सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Public Service Commission gives Prelims 2020 candidates to change exam centre

Tags
टॉपिकस
Topic Tags: