पुणे मेट्रोच्या 'या' मार्गावर टीओडी झोन लागू; काय आहे हा टीओडी झोन?

Pune_Metro
Pune_Metro

पुणे : पुणे महापालिकेपाठोपाठ आता महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो प्रकल्पाच्या मार्गावर ही टीओडी झोन (ट्रान्झिट ओरिएन्टेड झोन) लागू करण्यास राज्य सरकारने अखेर मान्यता दिली. त्यामुळे या मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात देखील चार एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

पीएमआरडीएने हिंजवडी ते शिवाजीनगर असा मेट्रो प्रकल्प हाती घेतला आहे. या मेट्रो मार्गाला राज्य आणि केंद्र सरकारने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे. हा संपूर्ण मार्ग इलिव्हेटेड असणार आहे. तर पुणे महापालिकेने महामेट्रोच्या माध्यमातून वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-ते स्वारगेट हे दोन मेट्रो मार्गाचे काम हाती घेतले आहे.

हे दोन्ही मार्ग आर्थिकदृष्ट्या किफायतशीर व्हावेत, यासाठी मेट्रो मार्गाच्या स्टेशनच्या पाचशे मीटर परिसरात चार एफएसआय वापरून बांधकाम करण्यास परवानगी द्यावी, अशी शिफारस पुणे महापालिकेने राज्य सरकारकडे केली होती. त्यास राज्य सरकारने मध्यंतरी मान्यता दिली. 

पुणे महापालिकेच्या धर्तीवर पीएमआरडीएने देखील हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यानच्या मेट्रो मार्गावर स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात टीओडी झोन वापरण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य सरकारला केली होती. परंतु राज्य सरकारच्या पातळीवर हा प्रस्ताव प्रलंबित होता. आज अखेर राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने त्यास आज मान्यता दिली. तसेच आदेश नगर विकास खात्याचे अवर सचिव किशोर गोखले यांनी काढले आहे. त्यामुळे पीएमआरडीएने प्रस्तावित केलेल्या मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिसरात चार एफएसआय वापरून बांधकाम करणे शक्‍य होणार आहे. 

हिंजवडी ते शिवाजीनगर हा 23 किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग आहे. ही मेट्रो शिवाजीनगर येथे महामेट्रोला जोडली जाणार आहे. या मार्गावर एकूण 23 मेट्रो स्टेशन असणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही हद्दीच्या शहरातून ही मेट्रो जाते. या मेट्रो मार्गावरील स्टेशनच्या परिसरात ही टीओडी झोन लागू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे आता हिंजवडी, बाणेर, बालेवाडी, वाकड, माण आणि शिवाजीनगर या भागातून जाणाऱ्या मेट्रोच्या परिसरात चार एफएसआय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने एमआरटीपी ऍक्‍ट मधील कलम 154 खाली याबाबतचे आदेश काढले आहेत. त्यामुळे आजपासून ते आदेश लागू झाले आहे. एकीकडे त्यांची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले असताना दुसरीकडे हरकती-सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे देखील दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com