
तात्या लांडगे
सोलापूर : शासन व पंढरपूर मंदिर समिती आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात वारकरी संप्रदाय आंतरराष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तयार केला आहे. त्यासाठी ५०० एकर जागा आणि पाच वर्षांसाठी २७१ कोटी ६६ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचेही प्रस्तावात नमूद आहे.
दरवर्षी पंढरपूरमध्ये आषाढी, कार्तिकी, चैत्री आणि माघ वारी अशा चार मोठ्या वाऱ्या होतात. यामध्ये लाखो भाविक पंढरपूरमध्ये श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. त्यात आषाढी वारीचा सोहळा हा खूपच मोठा असतो. मुख्यमंत्र्यांना त्याच्या महापूजेचा मान आहे. शेकडो किलोमीटर पायी प्रवास करून लाखो वारकरी पालख्यांमधून पंढरपूरमध्ये येतात. वारीची परंपरा, लाखो वारकऱ्यांचा प्रवास, त्यांचे अनुभव, अशा अनेक बाबींचा सखोल अभ्यास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने वारकरी संप्रदाय आंतरराष्ट्रीय संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रभाकर कोळेकर, डॉ. तानाजी देशमुख व डॉ. शिवाजी वाघमोडे यांनी हा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मान्यता दिली असून आता तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यात ५०० एकर जागेसाठी सर्वाधिक २०९ कोटी ७० लाख रुपये लागणार आहेत. याशिवाय प्रशिक्षण व अध्यापन प्रशिक्षण वर्ग, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वसतिगृह, भक्त व अध्यापक प्रशिक्षक व कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, वस्तुसंग्रहालय अशा बाबींसाठीही सुमारे ६२ कोटींचा निधी लागणार असल्याचे प्रस्तावात नमूद आहे.
केंद्राची आवश्यकता का?
वारकरी परंपरेशी संबंधित विविध भाषेतील साहित्य, तत्वज्ञान, संगीत कला, संस्कृतीवर प्रमाणपत्र, पदविका, पदवी, संशोधन अभ्यासक्रम तयार करून साहित्य प्रकाशित करणे
दिंडी, वारी, रिंगण व पालखी फड यामधून गर्दीच्या व्यवस्थापन कौशल्याचा अभ्यास करणे
धर्म, अध्यात्म व विज्ञान यांच्या समन्वयातून मानवी आरोग्यविषयक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा शास्त्रीय अभ्यास करणे
सांस्कृतिक, धार्मिक पर्यटनस्थळ म्हणून विकास करून आर्थिक विकासाचे प्रकल्प हाती घेणे
ग्रंथालय, संग्रहालय व प्रशिक्षणातून वारकरी परंपरेचा वारसा जतन व संवर्धन करणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.