Unseasonal Rain: महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट! 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात पावसाला पोषक हवामान असल्यामुळे आकाश ढगाळ होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. आज शुक्रवारी (ता. ५) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
Weather Update
Weather UpdateEsakal

राज्यात पावसाला पोषक हवामान असल्यामुळे आकाश ढगाळ होत आहे. किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी झाली आहे. आज शुक्रवारी (ता. ५) राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर किमान तापमानात कमी-जास्त होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान गोंदिया येथे १३.५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. पुण्यात किमान तापमानाचा पारा १५.९ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला.(Maharashtra Rain News)

उत्तर भारतात थंडीची लाट आल्याने, गुरुवारी (ता. ४) राजस्थानमधील सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी एक अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. आग्नेय अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, लक्षद्वीप बेटांजवळ चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यापासून दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर कर्नाटकपासून उत्तर प्रदेशपर्यंत चक्राकार वाऱ्यांपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. गुरुवारी (ता. ५) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

Weather Update
Weather Update: हिवाळ्यात पावसाळा! उत्तर प्रदेश-बिहारमध्ये कडाक्याच्या थंडीत पावसाची शक्यता; धुक्यांमुळे अनेक विमान उड्डाणे रद्द

पुण्यात ढगाळ वातावरण असल्याने किमान तापमानाचा पारा ५.१ अंश सेल्सिअसपर्यंत वाढला आहे. तर, कमाल तापमान ३०.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

राज्यातील कोणत्या भागात पावसाची शक्यता

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील ७२ तासांत दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणासह रायगड जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे.

धुळे, नंदुरबार येथेही रविवारपर्यंत हलक्या पावसाची शक्यता आहे. जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह पाऊस पडू शकेल, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाने दिली.

तर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवारी तुरळक पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Weather Update
Udayanraje Bhosale : जितेंद्र आव्हाडांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; प्रभू श्रीरामांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक

गुरुवारी सकाळपर्यंतच्या नोंदलेले तापमान

पुणे १५.९, धुळे १३.६, जळगाव १६.९, कोल्हापूर १९.७, महाबळेश्वर १५.५, नाशिक १५.९, निफाड १३.५, सांगली १९.९, सातारा १६.५, सोलापूर १९, सांताक्रूझ १९, डहाणू १८.५, रत्नागिरी २१.२, छत्रपती संभाजीनगर १६.४, नांदेड १७.८, परभणी १६.४, अकोला १७.५, अमरावती १७.१, बुलडाणा १७.५, ब्रह्मपुरी १५.४, चंद्रपूर १५.२, गडचिरोली १४.८, गोंदिया १३.५, नागपूर १६, वर्धा १६. (किमान तापमान अंश सेल्सिअसमध्ये)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com