ठाणे, रायगड, नंदुरबारला अवकाळी पावसाने झोडपलं; राज्यात ढगाळ वातावरण, आंब्यासह रब्बी हंगामातील पिकं धोक्यात

Maharashtra Weather Updates : राज्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून मंगळवारी पहाटे काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे आंबा आणि रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.
Unseasonal Rain Hits Maharashtra Crops Under Threat

Unseasonal Rain Hits Maharashtra Crops Under Threat

Esakal

Updated on

Unseasonal Rain Hits Maharashtra : राज्यात बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून रायगड जिल्ह्यात मंगळवारी पहाटे पावसाने हजेरी लावली. ठाणे, नंदुरबार या जिल्ह्यातही अचानक पावसाच्या सरी कोसळल्या. अवकाळी पावसाने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. रायगडमध्ये पेण परिसरात गणेशमूर्ती व्यावसायिक, वीट भट्टी व्यावसायिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. तर आंब्याच्या मोहरावरही परिणाम होऊन नुकसान होऊ शकतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com