हरियाणात शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 16 जानेवारी 2019

हरियाणा राज्यातील भंबेरडीगाव कर्नाळमध्ये शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हे अनावरण शिवप्रेमी अभयराज शिरोळे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी त्यांच्याबरोबर शिवदेव विठ्ठल विंचुरकर यांचे वंशज सरदार नारणराव विंचुरकर हेही होते.

भंबेरडी (हरियाणा)- हरियाणा राज्यातील भंबेरडीगाव कर्नाळमध्ये शिवाजी महाराजांच्या पहिल्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. हे अनावरण शिवप्रेमी अभयराज शिरोळे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. यावेळी त्यांच्याबरोबर शिवदेव विठ्ठल विंचुरकर यांचे वंशज सरदार नारणराव विंचुरकर हेही होते.

14 जानेवारी हा दिवस पानिपतवर झालेल्या युद्धात धारातिर्थी पडलेल्या सैनिकांचा शार्य-स्मृति दिन म्हणुन साजरा केला जातो. यंदाचे त्याचे 258 वे वर्ष होते. युद्धात एकाच धारातीर्थी पावलेले लोक हे एकाच जातीधर्माचे नसुन अनेक जाती व धर्माचे लोक होते. या वेळी या युद्धात धारातीर्थी पावलेल्यांना शिरोळे व विंचुरकर श्रद्धांजली अर्पण करायला गेले होते. 

शिरोळे आणि विंचुरकर यावेळी खूपच भावनिक झालेले पहायला मिळाले. यावेळी सगळ्यांनी संकल्प केला की, प्रत्येक गावागावात आणि प्रत्येक घरांघरांत महाराज पोहोचले पाहिजेत.

Web Title: Unveiling of Shivaji Maharaj's first statue in Haryana