esakal | 'विधानसभा निवडणुकीत महायुतीला 229 जागा मिळतील'
sakal

बोलून बातमी शोधा

'विधानसभा निवडणुकीत महायुतीला 229 जागा मिळतील'

- विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला मिळतील 229 जागा.

'विधानसभा निवडणुकीत महायुतीला 229 जागा मिळतील'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाची सत्ता येईल, याबाबत चर्चा सुरु आहेत. त्यानंतर आता भाजपने अंतर्गत सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणांतर्गत विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीला 229 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना या सत्ताधारी पक्षात इतर पक्षातील नेतेमंडळी प्रवेश करत आहेत. ही विधानसभा निवडणूक जिंकून सर्वाधिक जागा मिळविण्याचा प्रयत्न भाजप-शिवसेनेकडून केला जात आहे. असे असताना आता विधानसभेच्या 288 जागांपैकी 229 जागांवर महायुतीचा विजय होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

दरम्यान, भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातून ही बाब समोर आली असली तरी येत्या काही दिवसांत होणाऱ्या निवडणुकीच्या निकालानंतरच पुढील चित्र स्पष्ट होईल. 

loading image
go to top