पुण्याच्या अपर जिल्हाधिकारीपदी साहेबराव गायकवाड; 11 जणांच्या बदल्या

collector
collector

नाशिक : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील अकरा अपर जिल्हाधिकारी यांची बदली करण्यात आली आहे. 

बदली झालेल्यांमध्ये दीपक नलावडे (उपायुक्त पुणे) यांची अपर जिल्हाधिकारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी पुणे येथे, साधना सावरकर यांची उपायुक्त पुनर्वसन विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, रमेश काळे यांची उपायुक्त पुनर्वसन विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक, साहेबराव गायकवाड यांची अपर जिल्हाधिकारी पुणे,  नंदकुमार बेडसे यांची अपर जिल्हाधिकारी जळगाव, ज्ञानेश्वर जगदाळे अपर जिल्हाधिकारी धुळे, वैदेही रानडे अपर जिल्हाधिकारी ठाणे, अविनाश पाठक मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, नयना बोंदाडे उपायुक्त पुणे,  भारत बास्टेवाड महाव्यवस्थापक भुमी सर्वेक्षण रस्ते विकास महामंडळ मुंबई, रवींद्र खेबुडकर यांची अपर जिल्हाधिकारी बीड येथे बदली करण्यात आली आहे.

उपसचिव डॉ. माधव वीर यांच्या स्वाक्षरीने हा बदल्यांचा आदेश काढण्यात आला आहे. राज्यपालांच्या आदेशानुसार या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com