यूपीएस मदान यांची मुख्यमंत्र्यांच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती

यूपीएस मदान यांची मुख्यमंत्र्यांच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष सल्लागार म्हणून यू.पी.एस. मदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मदान हे राज्याच्या मुख्य सचिवपदावरून निवृत्त होत आहे. आता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांचे विशेष सल्लागारपदावर केली गेली आहे. 

यू.पी.एस. मदान हे 1983 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मागील वर्षी मार्च महिन्यात त्यांची नियुक्ती मुख्य सचिवपदावर करण्यात आली होती. मुख्य सचिवपदापूर्वी मदान यांच्याकडे राज्यातील अर्थ विभागाच्या सचिवपदाची जबाबदारी होती. त्यानंतर आता त्यांच्याकडे विशेष सल्लागार पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. येत्या ऑक्टोबरमध्ये मदान सेवानिवृत्त होणार आहेत. 

दरम्यान, मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून, नियुक्तीचा अधिकृत आदेश आल्यानंतर अजोय मेहता मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्विकारणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com