"इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टिम'चा ठाणे शहरासाठी विचार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 मार्च 2017

मुंबई - ठाणे शहरातील वाढते नागरीकरण पाहता येथील लोकांच्या सोयीसाठी "इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टिम' विकसित करण्याबाबत विचार केला जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितले. 

मुंबई - ठाणे शहरातील वाढते नागरीकरण पाहता येथील लोकांच्या सोयीसाठी "इंटिग्रेटेड ट्रान्सपोर्ट सिस्टिम' विकसित करण्याबाबत विचार केला जाईल, असे नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज विधान परिषदेत सांगितले. 

विधान परिषद सदस्य डॉ. निरंजन डावखरे, जयंत पाटील यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला डॉ. पाटील यांनी उत्तर दिले. डॉ. पाटील म्हणाले, 2011 च्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या 18 लाखांहून अधिक आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट (सीआयआरटी) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ठाणे शहरासाठी एकूण 700 बसची आवश्‍यकता आहे. सध्या ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेच्या 445 बसपैकी दररोज सरासरी 264 बस प्रवाशांसाठी उपलब्ध होतात. तर बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महापालिका परिवहन सेवेच्या सुमारे 300 बस ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात येतात. महापालिका क्षेत्रात महिला प्रवाशांसाठी राज्य शासनामार्फत तेजस्विनी बस योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. 

पुणे येथील वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुणे, पिंपरी-चिंचवडसाठी एकत्रित परिवहन योजना राबविण्यात येते. त्याच धर्तीवर ठाणे येथेही अशी योजना राबविता येऊ शकते का, याचा अभ्यास करण्याचे निर्देश या वेळी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी संबंधित विभागाला दिले.

Web Title: Urban Development Minister Dr. Ranjit Patil