Vidhan Sabha 2019 : निवडणुकीसाठी तीन राज्यांतील ईव्हीएमचा वापर

सिद्धेश्‍वर डुकरे  
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

मुंबई - राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील मतदानासाठी निवडणूक आयोगाने तयारी केली असून आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश आणि तमिळनाडू या तीन राज्यांतील इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन (ईव्हीएम) वापरण्यात येणार आहेत. या मशिनची सर्व प्राथमिक तपासणी झाली असून, मतदानासाठी ही यंत्रे अद्ययावत आहेत.

लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज भरण्यास सुरवातदेखील झाली असून, येत्या २१ ऑक्‍टोबर रोजी मतदान होणार आहे. शुक्रवार (ता. २७)पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली, त्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व प्रकारची तयारी केली आहे. 

राज्यातील २८८ जागांसाठी मतदान पार पाडण्यासाठी सुमारे एक लाख ईव्हीएम मशिनची गरज आहे. ही गरज तीन राज्यांतील मशिनच्या माध्यमातून भागवली जात आहे. या मतदानासाठी बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट यंत्रे मागवली आहेत. या यंत्रांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून, ही यंत्रे स्ट्रॉग रूममध्ये सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहेत. या तीन राज्यांबरोबरच बंगळूर येथील भारत इलेक्‍ट्रिक लिमिटेड येथूनही यंत्रे मागवण्यात आली आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Use of EVM in three states for elections