बीएलओंच्या बैठकीत ‘नालायकपणा’ शब्दाने उडविला गोंधळ! ‘एसआयआर’ प्रशिक्षणाच्या बैठकीतील प्रकार; प्रांताधिकाऱ्यांनी शब्द मागे घेतला, जिल्हाधिकाऱ्यांना दिला अहवाल

भारत निवडणूक आयोगाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेतील कामाचा आढावा घेण्यासाठी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील बीएलओंची बैठक बोलविण्यात आली होती. सरासरीपेक्षा कमी प्रगती असलेल्या १०३ बीएलओ यांना संबंधित बीएलओंना यापूर्वी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली आहे. तुमचे काम वाढवा अशी सूचना प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केली.
SIR meeting

SIR meeting

sakal

Updated on

सोलापूर : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेतील कामाचा आढावा घेण्यासाठी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील बीएलओंची बैठक बोलविण्यात आली होती. सरासरीपेक्षा कमी प्रगती असलेल्या १०३ बीएलओ यांना संबंधित बीएलओंना यापूर्वी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आलेली आहे. तुमचे काम वाढवा अशी सूचना प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी केली.

तुम्ही काही केले तरीही टार्गेट पूर्ण होणार नसल्याचे शिक्षकाने सांगितले. त्यावर असला नालायकपणा चालणार नसल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले. नालायकपणा या शब्दावरून सभागृहात एकच गोंधळ उडाला. या शब्दाला उपस्थित बीएलओंनी तीव्र आक्षेप घेतला. संबंधित कर्मचाऱ्यावर एफआयआर दाखल करण्याचेही आदेश दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. त्यानंतर सर्व बीएलओंनी एकत्रितपणे विरोध नोंदवत संबंधित शब्द मागे घेण्याची मागणी केली. अखेरीस प्रांताधिकारी यांनी आपण आपले शब्द मागे घेत आहोत असे जाहीर केल्यानंतर वातावरण शांत झाले. प्रांताधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वरिष्ठांना दिला अहवाल

ज्या बीएलओंचे काम सरासरीपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी ही बैठक होती. या कामाला मुदतवाढ मिळणार नसल्याने हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी रोज ७० ते ८० फॉर्म भरण्याची बैठकीत सूचना करण्यात आली. काहीही केले तरीही हे काम होणार नसल्याचे उत्तर आल्याने मी हा शब्द वापरला, घडलेल्या प्रकराचा अहवाल वरिष्ठांना दिला आहे.

- सदाशिव पडदुणे, प्रांताधिकारी

अडचणी सोडविण्यावर भर देणे आवश्यक

सर्व शिक्षक-बीएलओ हे काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र प्रत्येक बीएलओला एक सहाय्यक उपलब्ध करून दिल्यास माहिती संकलन, पडताळणी आणि ऑनलाइन नोंदीचे काम अधिक वेगाने पूर्ण होऊ शकते. केवळ नोटिसा, कारवाईची भाषा आणि दबाव याऐवजी प्रत्यक्ष अडचणी सोडविण्यावर भर देणे आवश्यक आहे.

- राजकिरण चव्हाण, शिक्षक प्रतिनिधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com