राज्यात कोरोनाचा उद्रेक; CM उद्धव ठाकरेंनी PM मोदींना पत्र लिहून केली विशेष विनंती

CM Maharashtra
CM Maharashtra

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना लसीकरणासंदर्भात एक विशेष मागणी करणारं पत्र लिहलं आहे. 25 वर्षे वयावरील सर्व नागरिकांसाठी लस उपलब्ध करुन द्यावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे. तसेच 45 वर्षे वयावरील नागरिकांसाठी लस उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या पत्रात मोदींचे आभार देखील मानले आहेत. 

काय म्हटलंय पत्रात?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात चिंतेचं वातावरण आहे. जास्तीतजास्त कोरोनाच्या चाचण्या करवून आपण याला आळा घालण्याच्या प्रयत्नात आहोत. कोरोना लसीकरणाची मोहीम महाराष्ट्राने अत्यंत गांभीर्याने घेतली असून लसीकरणात महाराष्ट्र राज्य क्रमांक एकवर आहे. रविवार, 4 एप्रिलच्या आकडेवारीनुसार 76.86 लाख लोकांना महाराष्ट्रात लस देण्यात आली आहे. तसेच परिस्थितीचं गांभीर्य पाहता राज्यातील 6 अधिक बाधित जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लसीचं वितरण करण्यात आलं आहे. मात्र, मी विनंती करतो की वय वर्षे 25 च्या वरील सर्व लोकांना लस देण्यास मुभा देण्यात यावी. मोठ्या प्रमाणावर तरुण आणि काम करणाऱ्या वर्गाला लस दिली तर, कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी होऊ शकतं, असं मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटलं आहे.  

अरविंद केजरीवाल यांनीही लिहलं पत्र
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीसहित देशभरात वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावरील सर्व प्रकारच्या अटी शर्थी हटवण्याची मागणी केली आहे. केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीकरण केंद्र उघडण्याच्या अटींमध्ये सूट तसेच लसीकरणासाठीच्या वयाची मर्यादा देखील हटवण्याची मागणी केली आहे. दिल्लीमध्ये दररोज तीन ते चार हजार कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. केजरीवालांनी पत्रात लिहलंय की, जर लसीकरण केंद्र उघडण्याच्या नियमांमध्ये सूट दिली गेली तर दिल्ली सरकार सर्व दिल्लीवासीयांना तीन महिन्यांच्या आतच लस देऊ शकते, असं त्यांनी या पत्रात म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com