Uddhav Thackeray : काँग्रेसीही भाजपाध्यक्ष होऊ शकेल; काँग्रेस अशोकरावांच्या ताब्यात देणार काय?

कालपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा करणारे अशोक चव्हाणही ‘आदर्श’मधील गैरव्यवहाराचे लपविण्यासाठी भाजपमध्ये जातील.
uddhav thackeray ashok chavan
uddhav thackeray ashok chavansakal

वैजापूर - ‘सिंचन गैरव्यवहाराचे आरोप झाल्याने अजित पवार भाजप सोबत गेले. आता कालपर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा करणारे अशोक चव्हाणही ‘आदर्श’मधील गैरव्यवहाराचे लपविण्यासाठी भाजपमध्ये जातील. आत्मविश्वास नसल्याने भाजप फोडाफोडी करतोय. उद्या काँग्रेसमधून आलेला माणूस भाजपाध्यक्ष झाल्यास आश्चर्य वाटू’ अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली.

वैजापूरमध्ये आयोजित जनसंवाद मेळाव्यात ते म्हणाले, की शिवसेना मिंध्यांच्या ताब्यात दिली, पवारसाहेबांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या ताब्यात दिली, आता काँग्रेस अशोकरावांच्या ताब्यात देणार काय? ‘भाजप भाडोत्री-बाजारबुणगे माणसे घेत आहे आणि भाजपच्या निष्ठावंतांना सतरंज्या उचलायला लागताहेत. पण माझ्या शेतकऱ्याकडे कोण बघणार? शेतकऱ्यांची, रोजीरोटीची गॅरंटी नाही.

तुम्ही भ्रष्टाचार करून भाजपमध्ये या तुम्हाला आमदार, खासदार, मंत्री करू हीच आहे का ‘मोदी गॅरंटी’,’ असाही त्यांनी सवाल केला. तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. मेळाव्यास खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आदींची उपस्थिती होती.

ही असू शकतात राजीनाम्याची कारणे

काँग्रेस पक्षाला भविष्यात पुन्हा ऊर्जितावस्था येईल की नाही तसेच राज्यात आणि केंद्रात पुन्हा काँग्रेस सत्तेत येईल, याची शाश्वती नसल्याने सुरक्षित पर्याय म्हणून राजीनामा दिला असावा विविध तपास यंत्रणांचा ससेमिरा तसेच मागील ‘आदर्श’ प्रकरण आणि भाऊराव सहकारी साखर कारखान्यासाठी १५० कोटी रुपयांची कर्जाला केंद्र व राज्य सरकारने दिलेली हमी पाहता हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

राज्यात अशोक चव्हाण यांनी दोनवेळा मुख्यमंत्रिपदी काम केले आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यांचा सूर जुळला नाही.

अशोक चव्हाण यांची राजकीय वाटचाल

  • १९८६-१९८९ - महासचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

  • १९८७-१९८९ - खासदार

  • १९९२ - विधान परिषद सदस्य

  • १९९३ - राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम, नगरविकास, गृह विभागाचे राज्यमंत्री

  • १९९५-१९९९ - महासचिव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

  • १९९९ - विधानसभेचे मुदखेड मतदारसंघातून आमदार; राज्य सरकारमध्ये महसूलमंत्री

  • २००३ - राज्य सरकारच्या परिवहन, बंदरे, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार विभागाचे मंत्री

  • २००४ - विधानसभेचे दुसऱ्यांदा आमदार; राज्य सरकारच्या उद्योग, खनिकर्म, सांस्कृतिक कार्य व राजशिष्टाचार विभागाचे मंत्री

  • २००८ - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (पहिला कार्यकाळ)

  • २००९ - विधानसभेचे तिसऱ्यांदा आमदार; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (दुसरा कार्यकाळ)

  • २०१० - मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

  • २०१४ - नांदेडमधून खासदार

  • २०१५ - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

  • २०१९ - लोकसभेसाठी नांदेडमधून पराभूत

  • २०१९ - चौथ्यांदा आमदार, राज्य सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाममंत्री

  • २०२३ - काँग्रेसच्या केंद्रीय कार्य समितीचे सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com