Atal Bihari Vajpayee : ठाकरे कुटुंबाने घेतले वाजपेयींचे अंत्यदर्शन

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

मुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय दिल्लीला गुरुवारी (ता. 16) रवाना झाले होते.

मुंबई - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनाला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कुटुंबीय दिल्लीला गुरुवारी (ता. 16) रवाना झाले होते.

भाजप आणि शिवसेनेच्या संबंधांत काहीसा ताण आला असतानाही आज ठाकरे कुटुंब दिल्लीत हजर असलेल्या सर्व खासदारांसह भाजप मुख्यालयात गेले. काल रात्री उशिरा उद्घव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे, तसेच मुलगा व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सांत्वनासाठी वाजपेयींच्या घरी हजर होते. आज सायंकाळी ठाकरे कुटुंब परत आले.

संजय राऊत मुंबईत
शिवसेनेच्या शक्‍य असेल त्या सर्व खासदारांनी अंत्यदर्शनासाठी पोचावे असा निरोप होता. "सामना' या शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक संजय राऊत मात्र मुंबईत होते. भाजप विशेषत: पंतप्रधान मोदींवरील टीकेमुळे राऊत हे सहकारी पक्षाच्या रोषाचा विषय ठरले आहेत. क्रिकेटपटू अजित वाडेकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी ते हजर होते.

Web Title: Vajpayee's introspection by Thackeray family